मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ उद्या, ९ नोव्हेंबर रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडं राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळं आता राज्यात पुढं नेमकं काय होणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं भाजप-शिवसेना व मित्र पक्षांच्या महायुतीला सत्तास्थापनेचा कौल दिला होता. त्यामुळं महायुतीनं सत्ता स्थापन करणं अपेक्षित होतं. मात्र, शिवसेनेनं अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासह समसमान सत्ता वाटपाचा मुद्दा लावून धरला होता. तर, भाजप मुख्यमंत्री पद सोडण्यास राजी नव्हता. त्यामुळं निकाल लागून १४ दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटू शकला नाही. अखेर फडणवीस यांनी राजीनामा दिला. सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार यांच्यासह भाजपचे काही मोठे फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यपाल काय भूमिका घेतात?, कोणत्या पक्षाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण देणार? की राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार, याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; आता पुढं काय?
Reviewed by umesh
on
November 08, 2019
Rating:

No comments: